Wed, Jul 17, 2019 18:02होमपेज › Pune › क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्या भूमिपूजन

क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्या भूमिपूजन

Published On: Jul 22 2018 1:10AM | Last Updated: Jul 22 2018 1:00AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका व क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येणार्‍या क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय इमारतीचे सोमवारी (दि. 23)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे 

महापौर नितीन काळजे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी भाजप शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, पक्षनेते एकनाथ पवार, महापौर शैलजा मोरे, नगरसेवक विलास मडीगेरी, नामदेव ढाके, माउली थोरात, मोरेश्वर शेडगे, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे आदी उपस्थित होते. 

सोमवारी सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होईल. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, खा. अमर साबळे, खा. श्रीरंग बारणे, आ. गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार आहेत.   संग्रहालयाबाबत माहिती देताना गिरीश प्रभुणे म्हणाले की, क्रांतिवीर चापेकर बंधूंचा जुना वाडा ही पुरातन ऐतिहासिक वास्तू होती. ही वास्तू नव्याने उभारण्यास 1997 मध्ये शासनाकडून पालिकेस निर्देश प्राप्त झाले आहेत.  दोन टप्पे पूर्ण झाले तिसर्‍या टप्प्याचे काम हाती घेतले आहे.  या वास्तूमध्ये त्यांच्या वीर पत्नी दुर्गाबाई चापेकर या 1920 पर्यंत राहत होत्या. 

आज चापेकर वस्तूच्या निर्माणानंतर उर्वरित भागामध्ये आणि शेजारील एक वास्तू खरेदी करून  6 मजली राष्ट्रीय संग्रहालय उभे करण्याची योजना आखली.  त्या योजनेत महापालिकेने पूर्णत: सहकार्य व अर्थसहाय्य  करण्याचे मान्य केले.  या राष्ट्रीय संग्रहालयात पहिला मजल्यावर भारताच्या 2500 हजार वर्षाच्या काळातील ठळक 30 ते 35 दगडी शिल्प  सकारण्यात येतील. 

त्यात भगवान तथागत गौतम बुद्ध, महावीर बसवेश्वर  यांनी जो संदेश समतेचा दिला आहे.  यावर आधारित 3 शिल्पे असतील. आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त यांचे शिल्प असेल स्मारकच्या मधोमध 4 शिल्पांमध्ये शिवचरित्र साकारले असेल. उर्वरित भागात थोरले बाजीराव पेशवे, उमाजी नाईक, 1857 स्वातंत्र्यसमर, लहुजी आणि  वासुदेव बळवंत फडके ते सुभाषचंद्र बोस यांचे महानिर्वानापर्यंत आदी प्रसंग शिल्पांकीत करण्यात येतील.