Fri, Nov 16, 2018 13:12होमपेज › Pune › ‘भामा-आसखेड’ला अखेर निधी मिळणार

‘भामा-आसखेड’ला अखेर निधी मिळणार

Published On: Mar 01 2018 1:53AM | Last Updated: Mar 01 2018 1:50AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील भामा आसखेड पाणीपुरवठा आणि वडगाव बुद्रुक जलशुद्धीकरण केंद्र या दोन्ही योजनांसाठी अखेरचा 83 कोटींचा निधी अमृत योजनेंतर्गत महापालिकेला मिळणार आहे. हा निधी महापालिकेला वितरण करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यामुळे महापालिकेवरील मोठा आर्थिक भुर्दंड वाचणार आहे.

केंद्रात काँग्रेसप्रणीत सरकारच्या काळात ‘जेएनएनयूआरएम’ योजनेंतर्गत भामा आसखेड योजनेसाठी 380 कोटी, तर वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी 120 कोटी असा तब्बल 500 कोटींचा निधी मंजूर केला होता. या दोन्ही योजनांची कामे आता सुरू आहेत. त्यासाठीचा निधी महापालिकेला टप्प्यानुसार मिळाला आहे.