Tue, Jun 25, 2019 21:25होमपेज › Pune › भामा आसखेडचे पाणी मे 2019 पर्यंत पुण्यात 

भामा आसखेडचे पाणी मे 2019 पर्यंत पुण्यात 

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 18 2018 12:51AMपुणे : प्रतिनिधी
शहराच्या पूर्व भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी राबविण्यात येत असलेल्या भामा आसखेड योजनेचे काम मे 2019 पर्यंत पूर्ण होईल, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. 
भामा आसखेड प्रकल्पाला आणि जलशुद्धीकरण केंद्राला महापालिकेच्या स्थायी समितीने रविवारी भेट दिली व कामांच्या सद्यःस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी आ. मुळीक बोलत होते. संरक्षणासाठी आवश्यक पोलिसांचे मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. पाणीपुरवठा विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सदस्यांना माहिती दिली.

प्रकल्पाची प्रगती

जॅकवेलचे 70 टक्के काम पूर्ण 

पाण्याच्या खालील खडकाची नियंत्रित स्फोटके वापरून खोदाई करण्याचे महत्त्वाचे काम पुढील 

दोन दिवसांत सुरू होणार

चर्‍होलीपर्यंत 42 किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याच्या कामापैकी 36 किलोमीटरचे काम पूर्ण