Mon, May 20, 2019 08:01होमपेज › Pune › स्वतःच्या क्षमतेवर विश्‍वास ठेवा

स्वतःच्या क्षमतेवर विश्‍वास ठेवा

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 10:30PMपुणे : प्रतिनिधी

सध्या महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे. अनेक गावांचा कारभार महिला सरपंच चालवत आहेत. गावचा कारभार करण्यासाठी, गावातील महिलांचे अधिकार्‍यांचे रक्षण करण्यासाठी महिला सरपंचांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने आपल्या अधिकारांचा वापर करावा; तसेच आपल्या क्षमेतवर विश्वास ठेवून काम करावे,  असे आवाहन  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले. राज्य महिला आयोगाच्या वतीने जिल्ह्यातील महिला सरपंचांचे ‘कायदे व रोजगार’ या विषयावर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये रहाटकर यांनी उपस्थित महिला सरपंचांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे आदी या वेळी उपस्थित होते. 

रहाटकर म्हणाल्या, मी माझ्या कामावर निवडून आले आहे. अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि पूर्ण क्षमतेने काम करत राहिल्याने अनेक नेत्यांना मी निवडणुकीत पराभूत केले.  तसेच काम तुम्ही सर्व महिला सरपंचांनी करावे.  महिला सरपंचांना कायद्यांचे ज्ञान हवे. महिलांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी असणारे कायदे, दैनंदिन कामकाजातच उपयोगी पडणारे कायदे या सर्वांची  माहिती महिला सरपंचांना हवी.

सरपंच पती नावाची जमात...

मांढरे म्हणाले, माझ्या कार्यालयात येताना एखाद्या महिला सरपंचाचे कार्ड येते, आणि प्रत्यक्षात मात्र पुरुष येतात. त्यावेळी त्यांना विचारल्यावर सरपंच बाहेर आहेत असे सांगतात. सरपंच पती नावाची एक जमात सुरू केली आहे. महिला सरंपचांना संधी मिळाली आहे, जेव्हा तुुम्ही ज्ञानाने सक्षम व्हाल तेव्हाच या संधीचा उपयोग होईल.