Sat, Aug 24, 2019 23:15होमपेज › Pune › भिकारीमुक्त पुणे केवळ कागदावरच

भिकारीमुक्त पुणे केवळ कागदावरच

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 12:10AMपुणे : राज्यातील सर्व भिकार्‍यांचे पुनर्वसन करण्याचा संकल्प धर्मादाय आयुक्तालयाने फेब्रुवारी महिन्यात केला होता. यासाठी पोलिस, महिला बालकल्याण आणि विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयाने हे काम केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हे सगळे केवळ कागदावरच आहे. आजही पुणे शहरात भिकार्‍यांची संख्या वाढत असून यांचे पुनर्वसन करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. राज्यातील सुमारे 50 हजार भिकार्‍यांचे विविध योजनांद्वारे संस्थांच्या मदतीने पुनर्वसन केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र यासाठी प्रयत्न न झाल्याचे दिसून येत आहे.  

शहर आणि उपनगरामध्ये भिकार्‍यांचे रॅकेट वाढत आहे. शिवाय लहान मुलांना भिकेसाठी प्रवृत्त केले जात आहे. यातून माफियांकडून दरदिवशी हजारांचे ‘टार्गेट’ दिले जाते व ते पूर्ण न केल्यास त्यांचे शोषण केले जाते. हे थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.उपनगरामध्ये सिग्नलवर भिकार्‍यांची वाढती संख्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे अपघात होत आहे. शिवाय लहान मुलांना पुढे करून भीक मागण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचे दै.‘पुढरी’च्या सर्व्हेमधून उघड झाले आहे.