Wed, Jul 17, 2019 18:43होमपेज › Pune › सनबर्नविरोधात बावधन ग्रामस्थांचा रास्ता रोको

सनबर्नविरोधात बावधन ग्रामस्थांचा रास्ता रोको

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 25 2017 12:59AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

येत्या 28  ते 31 डिसेंबर बावधन येथे होणार्‍या सनबर्न कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध दिवसेंदिवस वाढत असून याविरोधात नगरसेवक किरण दगडे पाटील व बावधान ग्रामस्थांनी चांदणी चौक येथे रविवारी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच यावेळी ग्रामस्थांनी हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांना निवेदन दिले. 

सनबर्नच्या आयोजकांनी कोर्टाची व शासनाची दिशाभूल करून परवानगी घेत परसेट कंपनीच्या करमणूक कार्यक्रमाच्या नावाखाली परवानगी घेऊन फसवणूक केली आहे. त्यांनी विनापरवाना झाडांची कत्तल करून डोंगर पोखरला. हेमर्ल कंपनीचा अतिसंवेदनशील परिसर आहे. त्यामुळे  काही अनुचित प्रकार घडला तर याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल नगरसेवक किरण दगडे-पाटील यांनी उपस्थित केला. 

बावधनच्या सरपंच पियुषा किरण दगडे-पाटील म्हणाल्या, कार्यक्रमासाठी  ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला लागतो. ग्रामपंचायत किंवा  मी त्यांना कुठल्याही प्रकारचा ना हरकत दाखला दिलेला नाही. 

हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांना हा कार्यक्रम रद्द करण्यासाठी निवेदन देताना माजी सरपंच राहुल दुधाळे, वैशाली कांबळे, ग्रा. पं. सदस्य सचिन दगडे, आझाद दगडे,  वैशाली दगडे, नीलकंठ बजाज,  उमेश कांबळे,  सचिन धनकुडे, दीपक दुधाने,  वैभव मुरकुटे, धनंजय दगडे , गणेश कोकाटे, सुनील दगडे, नितिन दगडे उपस्थित होते. 

जनसेवा फाऊंडेशनकडूनही निवेदन 

सनबर्न  पार्टीमुळे  सामाजिक,   सांस्कृतिक  वातावरण  गढूळ  होण्याची शक्यता असल्याने या पार्टीवर बहिष्कार  टाकावा  आणि  कसलीही  परवानगी  न  देऊ नये यासाठी जनसेवा  फाऊंडेशनच्या  वतीनेही तहसीलदार  सचिन  डोंगरे  आणि  पौड  पोलिस  ठाण्याचे  पोलिस  निरीक्षक  सुरेश  निंबाळकर  यांना  लेखी  निवेदन  देण्यात  आले. यावेळी भूगाव  गावचे  माजी  उपसरपंच  उमेश  पवार,   माजी  सैनिक  अनिल  चोंधे,   बोतरवाडी  गावचे  ग्रामपंचायत  सदस्य  समीर  शेलार,   भूषण  फाळके,   विवेक  चोंधे,   अभिजित  चोंधे,   तेजस  चोंधे,   सिध्देश  कवडे  तसेच  फाऊंडेशनचे  इतर  कार्यकर्ते  उपस्थित  होते.