Wed, Jan 23, 2019 16:54होमपेज › Pune › लोणावळ्यात बँकेचे एटीएम मशिन फोडले 

लोणावळ्यात बँकेचे एटीएम मशिन फोडले 

Published On: Dec 07 2017 1:24AM | Last Updated: Dec 06 2017 11:58PM

बुकमार्क करा

लोणावळा : वार्ताहर 

लोणावळ्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या वॉचमनचे हातपाय बांधून पाच अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे एटीएम मशिन फोडून सुमारे नऊ लाख 88 हजार रुपये लांबवले. त्यानंतर चोरट्यांनी बँकेच्या सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून त्याचे अपहरण करून त्याला भोर तालुक्यातील किकवी गावच्या हद्दीत सोडून पोबारा केला. ही  घटना मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. 

याप्रकरणी बँकेचे वॉचमन सुरेश कापसे (65, रा. लोणावळा) यांनी फिर्याद दिली. एटीएम फोडल्याचा हा प्रकार मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आला.  भोर तालुक्यातील किकवी गावच्या हद्दीत सोडल्यानंतर कापसे यांनी त्यांच्या मुलाला या प्रकाराची माहिती फोनवरून दिली. कापसे यांच्या मुलाने या प्रकाराची माहिती संबंधितांना दिली. लोणावळा शहर पोलिसांना माहिती कळताच लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथरे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पहाणी केली. तपासाकामी श्‍वान पथकाची व ठसे तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली.