Sat, May 25, 2019 23:29होमपेज › Pune › फुले रंगमंदिरात राज्य बालनाट्य स्पर्धा

फुले रंगमंदिरात राज्य बालनाट्य स्पर्धा

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 17 2018 11:37PM

बुकमार्क करा
सांगवी/ पिंपरी : वार्ताहर 

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे  महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन पिंपळे-गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे करण्यात आले आहे.  19 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत विविध बालनाट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. 

बालनाट्ये बघण्यासाठी विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला आहे. परिसरातील विद्यार्थी - पालक व नाट्यप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांनी आतापर्यंत क्षितीजाच्या पलिकडे, मदर्स डे, इसकोट, मैत्र जीवांचे, माझ्या छत्रीचा पाऊस, हीच खरी मैत्री, जत्रा, तिसरे स्वातंत्र्य, जनावर, खेळताड आदी नाटके सादर केली आहेत.

रंग माझा वेगळा, मोबाईल महाराज, कोमल, नयन तुझे जादुगार, टेडी चार्ली रोबो आणि बंटी, बुद्धाची गोष्ट, छोटा मावळा, कड्यांची शाळा, अ ड्रिम वर्ल्ड, रंगीत गोष्ट, थेंबाचे टपाल आदी बालनाट्य तीन दिवसांत सादर होणार आहेत.