Thu, Jun 27, 2019 17:45होमपेज › Pune › मागासवर्ग आयोगाची दि. २९ जून रोजी बैठक

मागासवर्ग आयोगाची दि. २९ जून रोजी बैठक

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 1:01AMपुणे : प्रतिनिधी

मराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण जाणून घेण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक शुक्रवार दि. 29 जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 11 ते 6 या वेळेत होणार आहे. 

आयोगाचे अध्यक्ष, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रातील ज्या व्यक्ती, संस्था व संघटना यांना मराठा समाजाच्या मागासलेपणा संबंधी निवेदन सादर करावयाचे आहे त्यांनी लेखी पुरावा व ऐतिहासिक दस्तऐवज किंवा माहितीसह 29 जून रोजी 11 ते 5 या वेळेत विधानभवन सभागृहात जनसुनावणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोगाने केले आहे.