होमपेज › Pune › कार्ल्यात बच्चे कंपनीचे अनोखे वनभोजन

कार्ल्यात बच्चे कंपनीचे अनोखे वनभोजन

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 12:34AMकार्ला : वार्ताहर 

उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या असून, काही दिवसातच शाळा सुरू होतील.  बच्चे कंपनीचे सुट्टीचे दिवस संपत असून, खेळाबरोबर भोजनाची पार्टी करत आहेत; परंतु ही पार्टी कुठल्या हॉटेल, ढाब्यावार, घरात केली नाही तर चक्क झाडावरच जागा करून चूल पेटवत मसालेभाताच्या अनोख्या पार्टीची मजा घेतली. सुट्टीची मजा लुटण्याबरोबरच बच्चे कंपनीने झाडास इजा पोचणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसली.

शाळेला सुट्या लागल्यापासूनच  ग्रामीण भागातील मुले नदीवर, तलाव याठिकाणी पोहणे, चोर- शिपाई खेळ खेळत गावभर हिंडणे, विटी- दांडू, बॅट- बॉल, कबड्डी असे खेळ खेळत धमाल मौज मजा मस्ती करत असतात.   

कार्ल्यातील बच्चे कंपनीने अनोखी पार्टी करायच्या उद्देशाने आंब्याच्या झाडावर बांबू बांधून फळ्या व पत्रा टाकून माची केली. माचीवर  चूल करून वनभोजनाचा आनंद घेतला. यासाठी मसाले भाताचा बेत आखला होता. मसाले भातासाठी लागणारे साहित्य गोळा करून या बच्चे कंपनीने स्वत: मसाले भात शिवजून वनभोजनाचा भरपेट आनंद लुटला.