Sun, Feb 17, 2019 14:11होमपेज › Pune › दमलेले बाबा आम्हाला वेळ देतात

दमलेले बाबा आम्हाला वेळ देतात

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 17 2018 1:30AMपुणे ः प्रतिनिधी

आमचे बाबा प्रशासकीय सेवेत असल्याने त्यांचे कामाकडे अधिक लक्ष असते. बाबा रोज ऑफिसमधून थकून आले तरी आमच्या अभ्यासाकडे लक्ष देण्यास विसरत नाही. प्रामुख्याने गणित विषयाकडे बाबांचे विशेष लक्ष असल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांचे चिरंजीव शौर्य आणि श्रीया यांनी.

‘फादर्स डे’निमित्त शौर्य आणि श्रीया यांच्या चर्चा केल्यानंतर शासकीय कार्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी संभाळणार्‍या गित्ते यांच्यातील वडील मुलांनी उलागडून सांगितला. शौर्यने म्हणाला, मला क्रिकेट खेळायला आवडते. यामुळे अभ्यासाबरोबरच माझ्या क्रिकेटकडे देखील बाबांचे लक्ष असते. मी मॅचमध्ये किती धावा काढल्या याचीही देखील ते माहिती घेतात. मला आईला आणि श्रीयाला घेऊन सुट्टीच्या दिवशी फिरायला घेऊन जातात. किती ही कामात असले तरी आमच्या अभ्यासाकडे त्यांचे लक्ष असते. बाबांना मराठी चित्रपट पाहिला आवडतात.