Thu, Jun 20, 2019 06:31होमपेज › Pune › भाजप सोशल मीडिया सेलला शहांचा सतर्कतेचा इशारा

भाजप सोशल मीडिया सेलला शहांचा सतर्कतेचा इशारा

Published On: Jul 08 2018 7:31PM | Last Updated: Jul 08 2018 7:31PMपुणे : प्रतिनिधी

विरोधक जे मुद्दे मांडतात त्याला खोडून काढण्यासाठी आपल्याकडे संपूर्ण माहिती अद्यायवत ठेवणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास विरोधकांच्या सोशल मीडियावरील आक्रमणाला आपल्याला उत्तर देता येणार नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या योद्धांनी सतर्क राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले.

शहांनी आज बालगंधर्व रंगमंदिर येथे भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या स्वयंसेवकांशी अमित शहा यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर मुक्ता टिळक, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शहा म्हणाले, सोशल मीडियाच्या योध्यांनी स्वतःला चालू-घोडींची संपूर्ण माहितीच्या सोबत अपडेट रहाणे आवश्यक आहे. कुठलेही उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे डेटा उपलब्ध पाहिजे. जोपर्यंत तुम्ही डेटा घेऊन स्वतः अपडेट नाही होत तो पर्यंत तुम्हाला विरोधकांना उत्तर देता येता येणार नाही. असे सांगताना शहा म्हणाले, भाजपा सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत अशी टिका शरद पवार यांनी केली तर त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपाच्या काळात किती शेतकर्‍यांनी आत्महत्या केली याची माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. 

पुढच्या निवडणुकांचा प्रचार हा सोशल मिडियाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे त्याची तयारी करताना आपण जी पोस्ट टाकतोय ती कशासाठी टाकतोय, त्यात काय लिहितोय, ती कशी लिहितोय या कडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपली पोस्ट ही टोकदार असायला हवी. त्याचा परिणाम लोकांवर व्हायला हवा. सोशल मीडिया हे माध्यम सर्व सामान्यांपर्यंत पोचण्यासाठी मोठे व्यासपीठ असून, त्याचा पुरेपुर वापर आपल्याला करता आला पाहिजे. भाजपाचा विचार व संदेश आणि प्रसारमाध्यमांतील पक्षविरोधी येणार्‍या बातम्यांमागील तथ्य तळागळातील नागरिकांपर्यंत पोचवण्याचे काम सायबर योद्ध्यांनी करावे असे शहा म्हणाले.

बुथनिहाय स्मार्टफोन स्वयंसेवक तयार करा

भाजपा सरकार लोकाभिमूखकाम करत असून त्याला विरोधक नाव ठेवत आहेत. सरकार विरोधात प्रसार माध्यमातून येणार्‍या बातम्यांना नियोजनबद्धपणे प्रतिउत्तर देण्याचे गरज आहे. उत्साह, शिस्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने लोकांना आकर्षित करणारा मजकूर प्रसारित केला पाहिजे. पंचायत ते पार्लमेंट पर्यंत भाजपची सत्ता कायम कशी राहील यासाठी सोशल मीडियाने बुथनिहाय स्मार्टफोन स्वयंसेवक तयार करा असे आवाहन अमित शहा यांनी केले.