Sat, Apr 20, 2019 07:52होमपेज › Pune › ‘पुणेरी पगडी’च्या राजकारणात अमित शहांचाही शिरकाव 

‘पुणेरी पगडी’च्या राजकारणात अमित शहांचाही शिरकाव 

Published On: Jul 08 2018 7:02PM | Last Updated: Jul 08 2018 7:02PMपुणे : पुढारी ऑनलाईन 

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या जाहीर सभेत पक्षचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे व्यासपीठावर दोन पगड्या घालून स्वागत केले गेले. पारंपरिक पुणेरी पगडीला छेद देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद यांनी महात्मा फुलेेंची पगडी घालायचे त्या पध्दतीची पगडी घालून इथून पुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात हीच पगडी घालण्याचा सल्ला दिला होता.

आज अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांना रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यान मालिकेच्या कार्यक्रमात शहांनाही पुणेरी पगडी घालण्यात आली. त्यावेळी उपस्थीत असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे आता हे पुण्यातीलच दोन पगड्यांचे राजकारण येत्या काळात जोरदार गाजणार असे दिसते.

या दोन्ही पुणेरी पगड्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. एक पगडी पेशवाईचे प्रतिनिधीत्व करते तर दुसरी सामाजिक परिवर्तनाचे प्रतिक आहे. त्यामुळे या प्रातिनिधीक पगड्यांवरुन येत्या काळात जातीचे, वर्गाचे राजकारण पुण्यात तापणार असे दिसते.