Fri, Jul 19, 2019 22:32होमपेज › Pune › पाणी दरवाढी विरोधात भाजप विरोधकांचे आंदोलन(व्हिडिओ)

पाणी दरवाढी विरोधात भाजप विरोधकांचे आंदोलन(व्हिडिओ)

Published On: Feb 20 2018 2:23PM | Last Updated: Feb 20 2018 2:23PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रस्तावित दरवाढीविरोधात विरोधात आज भाजप विरोधकांच्या वतीने महापालिका प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली. राज्यात एकमेकांच्या विरोधात असलेले मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी हे सर्व पक्ष पाणी दरवाढीविरोधात एकवटले होते.

मनसे आणि शिवसेनेच्या वतीने स्वतंत्रपणे आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, मनसेने एकच ठिय्या दिल्याने शिवसेनेलाही याच आंदोलनात सहभागी व्हावे लागले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी नगरसेवकही या आंदोलनात दिसत होते. तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवाजी, पाणी दरवाढ रद्द करा नाहीतर खुर्च्या खाली करा, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, लुटून खा पुसून खा भाजपा. आशा घोषणा यावेळी निदर्शक देत होते.  

या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, रुपेश पट्टेकर, शिवसेनेचे आमदार  गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, पालिकेतील गटनेते राहुल कलाटे, महिला शहर संघटिका सुलभा उबाळे, मधुकर बाबर, मारुती भापकर, विमल जगताप, भगवान वाल्हेकर, राम पात्रे, अमित गावडे, रोमी संधू, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सं. जोग वाघेरे, नगरसेवक दत्ता साने, विनया तापकीर, मयूर क्लाटे, प्रवक्ते प्रशांत शितोळे आदी सहभागी झाले होते.

यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, ‘‘40 टक्के पाणी गळती आहे ती रोखली तर पाणी दरवाढ करण्याची गरज लागणार नाही. 

 ‘‘सत्ताधारी भाजपने गटनेत्‍यांना विचारात न घेता पालिकेच्या सभेपुढे पाणी दरवाढीचा विषय ठेवला. एकतर नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. 6 हजार लिटरपर्यंत मोफत पाणी देण्याची फसवी घोषणा केल्यावर आता पाणी दरवाढ लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही पालिकेने एवढी दरवाढ केली नाही. दरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल सचिन चिखले यांनी यावेळी दिला.