Mon, Mar 18, 2019 19:20होमपेज › Pune › शरद पवारांची टीका बोचली; शेलार बारामतीत

शरद पवारांची टीका बोचली; शेलार बारामतीत

Published On: Feb 23 2018 5:32PM | Last Updated: Feb 23 2018 7:55PMबारामती : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची शुक्रवारी (दि. २३) मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी भेट घेतली. पवारांसोबत त्यांनी विविध संस्थांनाही भेटी देत पाहणी केली. ही भेट राजकीय नसल्याचे सांगितले जात असले तरी दोन दिवसांपूर्वी प्रकट मुलाखतीतून भाजपवर जोरदार हल्ला चढविलेल्या पवार यांनाच शेलार यांनी बारामतीत गाठल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे. 

वाचा : ‘पावर’बाज उत्तराची ‘राज’कीय कारकीर्द

पुण्यात दोन दिवसांपूर्वी खासदार पवार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीची अद्याप चर्चा सुरू आहे. ठाकरेंचे प्रश्न आणि पवारांचे प्रत्येक उत्तर याचा राजकीय विश्लेषकांकडून अर्थ लावला जात आहे. विशेष म्हणजे पवार यांनी या मुलाखतीत भाजपवर हल्ला केला होता. त्यानंतर शुक्रवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पवारांची बारामतीत भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

वाचा : लोकसभा 2019: मोदींना अडचणीचे ठरणारे सात मुद्दे

शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाला शेलार यांनी पवार यांच्यासोबत भेट दिली. याशिवाय शारदानगर शैक्षणिक संकुल, कृषी विज्ञान केंद्र यांचीही पाहणी केली. यावेळी अन्य कोणालाही त्यांच्यासोबत राहण्यास मज्जाव करण्यात आला होता. शिवाय या भेटीबाबत प्रचंड गुप्तताही बाळगण्यात आली होती. त्यामुळे शेलारांची भेट नेमकी कशासाठी याची चर्चा सुरु झाली आहे. पवार यांना ते मुंबई, पुण्यातही भेटू शकले असते. त्यामुळे दिवसभर बारामतीत पवारांसोबत विविध संस्थांना भेटी देण्याचे कारण काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

राजकीय कारणांसाठी ही भेट नसल्याचे सांगितले जात असले तरी कधीही बारामतीशी जवळीक नसलेल्या शेलार यांच्या भेटीमुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संबंधित बातमीः

आमदार अनिल गोटे यांचे शरद पवारांना खुले पत्र