Thu, Jul 18, 2019 04:59होमपेज › Pune › मावळात भाजपचे तीन, तर राष्ट्रवादीचे दोन सरपंच

मावळात भाजपचे तीन, तर राष्ट्रवादीचे दोन सरपंच

Published On: Mar 01 2018 2:01AM | Last Updated: Mar 01 2018 12:44AMवडगाव मावळ : वार्ताहर 

मावळ तालुक्यात मंगळवार (दि.27) निवडणूक झालेल्या पाच ग्रामपंचायतींपैकी 3 ग्रामपंचायतींचे सरपंचपद भाजपने, तर 2 ग्रामपंचायतींचे सरपंचपद राष्ट्रवादीने पटकावले असून बहुमतात मात्र भाजप व राष्ट्रवादीने संमिश्र तर शिवसेनेने एका ग्रामपंचायतींमध्ये बहुमत पटकावले आहे.

तालुक्यातील भाजे, लोहगड, सांगिसे, वाकसई, मुंढावरे या पाच ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक मंगळवारी पार पडली. बुधवार (दि. 28) वडगाव मावळ येथील महसूल भवनमध्ये तहसीलदार रणजीत देसाई व नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

निवडणूक निकालानुसार भाजे, लोहगड व सांगिसेचे सरपंचपद भाजपने तर वाकसई व मुंढावरेचे सरपंचपद राष्ट्रवादीने पटकावले आहे. तसेच, भाजे व लोहगड या दोन ठिकाणी भाजपने तर सांगिसे व मुंढावरे या दोन ठिकाणी राष्ट्रवादीने बहुमत मिळविले असून वाकसई येथे शिवसेनेने बहुमत मिळवले आहे. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी भंडारा व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला तर पोलिस निरिक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ग्रामपंचायतनिहाय विजयी उमेदवार व मते पुढीलप्रमाणे :

मुंढावरे - सरपंच : नवनाथ हेलम(बिनविरोध), प्रभाग 1 : कैलास वाघमारे(123 मते), चंद्रभागा कदम(142 मते), पल्लवी थोरात(183 मते), प्रभाग 2 : सागर रणपिसे(173 मते), गोरख बांगर(177 मते), दिपाली गरवड(170 मते), प्रभाग 3 : राणी जाधव(171 मते), भारती थोरवे(153 मते)

लोहगड - सरपंच : नागेश मरगळे(103 मते), प्रभाग 1 : नितीन भोरडे(दोघे बिनविरोध), प्रभाग 2 : उषा बैकर(बिनविरोध), गणपत ढाकोळ(41 मते), प्रभाग 3. अरुण मरगळे(62 मते), स्वाती धानिवले व कविता विखार(दोघी बिनविरोध).

वाकसई - सरपंच : दिपक काशिकर(1416 मते), प्रभाग 1 : अनिता रोकडे(399 मते), पुनम येवले(376 मते), मनोज जगताप(बिनविरो), प्रभाग 2 : पुष्पा देसाई(358 मते), आरती कारके(386 मते), प्रदिप येवले(367 मते), प्रभाग 3 : महेंद्र शिंदे(378 मते), उषा देशमुख(386 मते), गणेश देशमुख(409 मते) प्रभाग 4 : कैलास काशिकर व निलम शेलार(दोघे बिनविरोध).

सांगिसे - सरपंच : बबन टाकळकर(314 मते), प्रभाग 1 : विष्णू जाधव(बिनविरोध), शोभा गरुड(186 मते), श्रध्दा दळवी(बिनविरोध), ज्ञानेश्‍वर भांगरे(173 मते), प्रभाग 3.विलास मानकर(बिनविरोध), चंदा पिंगळे(बिनविरोध),संगिता टाकळकर(बिनविरोध).

भाजे - सरपंच : चेतन मानकर(792 मते), प्रभाग 1 : मच्छिंद्रनाथ विखार(225), गोरक्षनाथ दळवी(228 मते), सुनिता दळवी(234 मते), प्रभाग 2: दिलीप भालेराव(239 मते), अश्‍विनी खाटपे(235), सविता शिवेकर(233), प्रभाग 3 : लताबाई कुंभार(212 मते), निता काकरे(158 मते), दिनेश ढगे(224 मते).