Sun, Mar 24, 2019 16:43होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवड : महापौरपदी भाजपचे राहुल जाधव; मनसेची मदत

पिंपरी-चिंचवड महापौरपदी भाजपचे राहुल जाधव

Published On: Aug 04 2018 12:45PM | Last Updated: Aug 04 2018 12:46PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव यांची निवड झाली आहे. महापौर, उपमहापौर यांची निवड करण्यासाठी आज (शनिवारी) महापालिकेच्या विशेष सर्वसाधरण सभेचे आयोजन करण्यात आले असून पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या संचालक नयना गुंडे कामकाज पाहिले. आता उपमहापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. उपमहापौरपदासाठी भाजपचे सचिन चिंचवडे आणि राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांच्यात लढत आहे.

 महापौरपदाच्या निवडुकीत भाजपचे राहुल जाधव यांना ८० मते तर, राष्ट्रवादीचे विनोद नढे यांना  ३३  मते मिळाली. सत्ताधारी भाजप व  राष्ट्रवादीचे  प्रत्येकी ३ नगरसेवक अनुपस्थित राहिले. तर, पाच अपक्ष नगरसेवक आणि मनसेचे सचिन चिखले यांनी भाजपला मतदान केले. यावेळी शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतली.

महापालिकेच्या सभेचे कामकाज सुरू होताच पीठासीन अधिकारी नयना गुंडे यांनी महापौरपदाच्या अर्जांची छाननी केली. त्यानंतर अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटे वेळ दिला होता. या मुदतीत कोणीही माघार घेतली नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवत मतदान घेण्यात आले. त्यामध्ये भाजपचे राहुल जाधव यांचा विजय झाला. 

महापौरपदी निवड झालेले जाधव हे मागील टर्मला मनसेचे नगरसेवक होते. यावेळी त्यांनी पालिका निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. जाधववाडी प्रभाग क्र 2 मधून ते निवडून आले आहेत .रिक्षा चालक ते महापौर असा त्यांचा प्रवास झाला आहे.