Fri, Apr 26, 2019 17:19होमपेज › Pune › २८ मार्चपासून भाजपचे ‘घर चलो अभियान’

२८ मार्चपासून भाजपचे ‘घर चलो अभियान’

Published On: Mar 20 2018 2:06AM | Last Updated: Mar 20 2018 12:57AMपिंपरी : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी येत्या दि.  28 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीमध्ये ‘घर चलो अभियान’ राबविणार आहे. या कालावधीत घरोघरी जाऊन केंद्र, राज्य व मनपा यांच्या विकासभिमुख योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.

याकरिता प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी यांचे गट तयार केले जाणार आहेत. असे गट घरोघरी जाऊन विकासाभिमुख योजनांची माहिती नागरिकांना देणार आहेत. अभियानादरम्यान मिळालेल्या प्रतिक्रिया व फोटो पक्ष कार्यालयाकडे पाठवले जाणार आहेत; तसेच सप्ताहातून एक दिवस स्वच्छता कार्यक्रम अभिनव पद्धतीने राबवून जाहीर कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

‘घर चलो अभियाना’च्या माध्यमातून शहरामधील 1300 बूथचे मजबूतीकरण करण्याचा निर्धार शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनी केला आहे. त्या प्रकारची जबाबदारी सर्व पदाधिकारी व नगरसेवक यांना दिली आहे.‘घर चलो अभियाना’चे पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख समन्वक म्हणून जबाबदारी अमोल थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे. मंडलाप्रमाणे जबाबदारी याप्रमाणे : अमोल थोरात- प्राधिकरण, चिंचवड, संजय मंगोडकर- चिंचवड स्टेशन, दापोडी, बाबू नायर- किवळे, थेरगाव, माउली थोरात-  सांगवी, काळेवाडी, प्रमोद निसळ- निगडी, चिखली, सारंग कामतेकर-  भोसरी, चर्‍होली, राजेश पिल्ले-  युवा मोर्चा, उमा खापरे-  महिला मोर्चा, सदाशिव खाडे-  अनुसूचित, अल्पसंख्याक, व्यापार व कामगार, सचिन पटवर्धन- उर्वरित आघाड्या अशा प्रकारे विभागांचे समन्वयक असणार आहेत.

‘घर चलो अभियाना’मध्ये खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, उमा खापरे, महेश कुलकर्णी, वसंत वाणी, अमर मूलचंदानी यांच्यासह पक्षातील सर्व पदाधिकारी व नगरसेवक सामील होणार आहेत.

भाजपचा येत्या 6 एप्रिलला वर्धापनदिन होणार आहे; तसेच भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन 6 एप्रिल रोजी मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे होणार आहे.पिंपरी-चिंचवडमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन जाण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती भाजप पिंपरी-चिंचवड शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिली.

 

Tags : Pimpri, Pimpri News,BJP, Home Campaign,