Mon, Jan 21, 2019 17:18होमपेज › Pune › आझम पानसरेंना निश्चित न्याय मिळेल 

आझम पानसरेंना निश्चित न्याय मिळेल 

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:35AMपिंपरी : प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना लवकरच  न्याय देऊ, असे आश्वासन सोमवारी (दि. 23) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात आले होते. पिंपरीच्या हॉटेल सिट्रसमध्ये पानसरे समर्थकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व पानसरे यांच्यासाठी साकडे घातले त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.यावेळी झिशान सय्यद, संदीप बेलसरे, नीता परदेशी, संजीवनी पांड्ये, पाशा जमादार, इम्रान बिजापुरे, मौलाना फल अहमद, हाजीकलम सअल, मौलाना अजिजी, मौलाना नय्यर नुरी, प्रतीक लोंढे, लतीफ सय्यद, इम्रान शेख, जफर मुल्ला, अजहर खान, बाळासाहेब भागवत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच  आ.  महेश लांडगे यांनी आपले राजकीय गुरू व शहरातील ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना भाजमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर  त्यांचे एकेकाळचे कट्टर राजकीय शत्रू  असलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील वैर सोडून पानसरे यांच्या भाजप प्रवेशासाठी अनुकूल भूमिका घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पानसरे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.  पालिकेत भाजपची सत्ताही आली.  त्यानंतर  पानसरे यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती अद्याप पूर्ण झाली नाही. विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या 11 जागांसाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान निवडणूक झाली.  त्यावेळी  पानसरे यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार अशी चर्चा होती. परंतु, या निवडणुकीत पानसरे यांना डावलण्यात आल्यामुळे मुस्लिम कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. आज या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.  मुख्यमंत्र्यांनी पानसरे यांना निश्चित  न्याय देण्याचे आश्वासन दिले.