Wed, Mar 27, 2019 00:04होमपेज › Pune › लैंगिक अत्याचार करणारा पार्लरचालक अटकेत

लैंगिक अत्याचार करणारा पार्लरचालक अटकेत

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 11:25PMपिंपरी : प्रतिनिधी  

नोकरीसाठी गेल्यानंतर काम येते की नाही हे पाहण्यासाठी मालकाने मसाज करायला लावले. यावेळी जबरदस्तीने सोळा वर्षाच्या पीडित मुलीसोबत लैंगिक अत्याचार केले आणि त्याचे चित्रीकरण करून ते दाखवण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पार्लर चालकास अटक केली आहे. हा प्रकार वाकड परिसरात नुकताच घडलेला आहे. 

सराफत बरकतअल्ली खान (24 वर्ष) असे अटक केलेल्या पार्लर चालकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सराफत याचे वाकड येथे पार्लर आहे. कामासाठी दोन मुली पार्लरमध्ये आल्या होत्या. त्यावेळी तुझे ‘ट्रायल’ घ्यावे लागेल, असे म्हणून त्या मुलीला फेशिअल करायला लावले. यावेळी त्याने पीडितेला मिठी मारून लगट करीत बळजबरी केली. हा सगळा प्रकार त्याने एका मोबाईलच्या सहायाने चित्रीकरण केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास सर्वांना रेकॉर्डिंग दाखवेन, अशी धमकीही मुलीला दिली.दुसर्‍या दिवशी पीडित मुलगी कामावर न आल्याने सराफत याने तिला फोन करुन कामावर येण्यास सांगितले. सराफत याच्याकडून वारंवार येणारे फोन व धमकी यामुळे तिने घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली असता पोलिसांनी सराफत याला अटक केली. तपास वाकड पोलिस करत आहेत.

 पीडित मुलगी तणावात

सराफत याने केलेल्या या सर्व प्रकाराला कंटाळून पीडित मुलगी तणावाखाली आहे.  ती दोन दिवसांपूर्वी घर सोडून गेली होती. याबाबत तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. नातेवाईकांच्या मदतीने पीडित मुलीचा शोध घेण्यात आला. यानंतर पीडित मुलीच्या आई-वडील, बहिणीने घडला प्रकार पोलिसांपुढे कथन केला.