होमपेज › Pune › पाणी मागण्याच्या बहाण्याने तरुणाला लुबाडले

पाणी मागण्याच्या बहाण्याने तरुणाला लुबाडले

Published On: Apr 18 2018 9:10AM | Last Updated: Apr 18 2018 9:10AMपिंपरी : प्रतिनिधी 

पाणी मागण्याचा बहाना करून चोरट्यानी एका तरुणाला मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील रोख रक्क्म आणि लॅपटॉप असा ऐवज चोरुन  नेला. हा प्रकार बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास मुंबई-बेंगलोर द्रुतगती महामार्गावर बावधन येथे घडला. 

याबाबत मिळाले्लया माहितीनुसार सुदर्शन शेडगे याची दुचाकी नादुरूस्त झाल्याने तो रस्त्यावर थांबला होता. त्यावेळी तेथे आलेल्या चोरट्यानी पाणी मागण्याचा बहाना करून, मारहाण करून लुबाडले. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.