Sun, Feb 17, 2019 05:52होमपेज › Pune › माणगाव : तरुणावर कुऱ्हाडीने खुनी हल्ला 

माणगाव : तरुणावर कुऱ्हाडीने खुनी हल्ला 

Published On: Apr 07 2018 2:21PM | Last Updated: Apr 07 2018 1:25PMपिंपरी : प्रतिनिधी 

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडच्या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दिवसाढवळ्या मारहाण, तरुणांवर हल्ले होत आहेत. त्यातच आता माणगाव येथे तरुणावर कुऱ्हाडीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री ही घटना घडली. तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव येथे राहणाऱ्या सतीश अशोक भोईर , (वय २७ वर्षे) याच्यावर हल्ला झाला आहे. या प्रकरणी सोपान पंढरीनाथ भोईर (वय ४० वर्षे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक  तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.

Tags : Crime, Attack, Man, Youth