Fri, Apr 26, 2019 19:43होमपेज › Pune › अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 07 2017 11:30PM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

आई अंघोळीसाठी गेली असताना, नराधम वडिलांनी स्वतःच्याच अडीच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे गुरव परिसरात सात ते आठ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून, बुधवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगवी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीवरून 25 वर्षीय नराधम बापाला अटक केली आहे. सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या नराधमाने पत्नी अंघोळीला गेली असता हा किळसवाणा प्रकार केला. मुलीची आई अंघोळीवरून आली असता तिने स्वतः डोळ्यांनी हा प्रकार बघितला. त्या वेळी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिलाही मारहाण केली. 

या प्रकारामुळे महिलेला मानसिक धक्का बसला होता. त्यातून सावरल्यानंतर तिने सांगवी पोलिसांत पतीविरुद्ध तक्रार दाखल केली.