Wed, Jan 22, 2020 23:27होमपेज › Pune › अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या  शहरात चार घटना

अर्धे जग असुरक्षितच!

Published On: May 06 2018 1:54AM | Last Updated: May 06 2018 1:21AMपुणे : प्रतिनिधी 

शहरात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असून, हडपसर, खडकी, येरवडा व वाकड येथे अल्पवयीन मुलींशी अश्‍लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याच्या पाच घटना मागील दोन दिवसांत उघडकीस आल्या आहेत, तर  कोथरूड येथे मतिमंद तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिच्यावर कोणीतरी अज्ञाताने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर, खडकी, येरवडा, वाकड व कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

हडपसरमधील पीडित 17 वर्षीय मुलगी व्यावसायिकाकडे काम करते. तिला 1 मे रोजी त्याने साईट दाखविण्याच्या बहाण्याने नेले. त्यानंतर पुन्हा घरी कोणीही नसताना तिला काही काम असल्याच्या बहाण्याने नेले. तेथे नेऊन तिच्याशी अश्‍लील चाळे करत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिसांनी त्याच्यावर विनयभंग व पोक्सो कायदा कलम 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

खडकी येथे खेळण्याचा बहाणा करून सात वर्षाच्या व 11 वर्षाच्या दोन मुलींना बोलावून त्यांच्याशी अश्‍लील चाळे केल्याचा प्रकार 26 एप्रिल रोजी घडला.  मुलींनी त्यांच्या आईला हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी हेमंत रामचंद्र काटेकर याला अटक केली आहे. येरवडा येथे चौदा वर्षीय मुलगी घमंडी आहे. तिचा घमंड आज मोडतोच असे म्हणत  तरुणाने तारकेश्‍वर डोंगरावर नेऊन तिला मारहाण करत बलात्कार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी पीडित मुलीच्या आईने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओमकार नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाकड येथे दुकानाबाहेर दोन वर्षाची मुलगी खेळत होती. त्यावेळी तिच्या आई-वडिलांचे लक्ष नसल्याचे पाहून तिच्याशी 21 वर्षाच्या तरुणाने अश्‍लील चाळे केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.