Wed, Jan 23, 2019 23:27होमपेज › Pune › विमानतळावर सहा सोन्याची बिस्किटे जप्‍त

विमानतळावर सहा सोन्याची बिस्किटे जप्‍त

Published On: Jul 22 2018 12:59AM | Last Updated: Jul 22 2018 12:46AMपुणे/प्रतिनिधी 

दुबई येथून तस्करी करून आणलेले 22 लाख रुपये किंमतीची सहा सोन्याची बिस्किटे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या पथकाने  जप्त केले. 

दुबईहून स्पाईस जेटचे विमान शनिवारी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. त्यावेळी कस्टम अधिकार्‍यांना या विमानाच्या टेव टोरीमध्ये ऑक्सिजन मास्क पॅनेलमध्ये सोन्याचे बिस्किट असल्याचे आढळून आले. त्यांनी तपासणी केली असता सहा सोन्याचे बिस्किटे एका काळ्या रंगाच्या चिकटपट्टीच्या साह्याने एका पिवळ्या रंगाच्या कापडात लपेटलेले आढळले.

त्यानंतर त्यांनी ही 699.90 ग्रॅम वजनाचे 21 लाख 90 हजार 750 रुपये किंमतीचे सहा बिस्किटे सोन्याची  जप्त केली. याबाबतचा पुढील तपास सुरू असल्याचे उपायुक्त महेश पाटील यांनी सांगितले.