Sat, Jul 20, 2019 15:00होमपेज › Pune › शालांतपूर्व शिक्षण घेणार्‍या अपंगांना मदत

शालांतपूर्व शिक्षण घेणार्‍या अपंगांना मदत

Published On: Feb 19 2018 1:37AM | Last Updated: Feb 19 2018 12:43AMपुणे : नवनाथ शिंदे

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने शालांतपूर्व (पहिली ते दहावी) शिक्षण घेणार्‍या अपंग विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. जिल्हा परिषदेच्या 2017-18 च्या अंदाजपत्रकात शालांतपूर्व अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 13 लाख 66 हजारांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील 556 अपंग लाभार्थींना शिष्यवृत्तीचे वितरण करून संपूर्ण तरतूद रक्कमेचा लाभ विद्यार्थ्यांना दिला आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात शालांतपूर्व शिक्षण घेणार्‍या अपंगासाठी तरतूद केली जाते. त्यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीच्या अपंग विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येतो. योजनेनुसार इयत्ता पहिली ते चौथीचे शिक्षण घेणार्‍या अपंग विद्यार्थ्यांला दर महिन्याला प्रत्येकी 100 रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. तर पाचवी ते सातवीचे शिक्षण घेणार्‍या अपंग विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला 150 रुपये भरले जातात. तसेच आठवी ते दहावीचे शिक्षण घेणार्‍या अपंग विद्यार्थ्यांला योजनेचा लाभ देण्यासाठी प्रत्येक महिन्याला 200 रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येते. तसेच शालांतपूर्व मतिमंद विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला 150 रुपयांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते  

जिल्हा परिषदेच्या 2017-18 च्या अंदाजपत्रकात शालांतपूर्व शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 13 लाख 66 हजारांची तरतूद करण्यात आली होती. तर अपंग विद्यार्थ्यांची 2016-17 मधील 2 लाख 59 हजार 700 रूपंयाची अखर्चित तरतूद शिल्लक होती. प्राप्त 13 लाख 66 हजारांची तरतूद आणि अखर्चित 2 लाख 59 हजारांची शिल्लक मिळून 16 लाख 25 हजार 700 रूपयांची तरतूद निश्‍चित करण्यात आली होती.  त्यानुसार जिल्ह्यातील अपंग विद्यार्थ्यांना हक्काची शिष्यवृत्ती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने आघाडी घेत 13 लाख 66 हजारांच्या शिष्यवृत्तीचे वितरण केले आहे. तर अंदाजपत्रकातील तरतूदीपैकी फक्त 1 हजार 200 रुपयांचा निधी शिल्लक आहे. 

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या 556 अपंग लाभार्थींना शिक्षणाची उंच भरारी घेण्यासाठी शिष्यवृत्तीच्या मदतीचा हात देण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शासन अनुदानित वसतिगृहातील किंवा अनुदानित निवासी शाळेतील नसणे आवश्यक आहे. सामान्य शाळा किंवा विशेष शाळेत अर्जदार शिक्षण घेत असल्यास त्याला शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देता येतो. दरम्यान शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी अर्जदाराच्या उत्पन्नाची मर्यादा नाही. त्यामुळे फक्त शिक्षण घेणार्‍या अपंग विद्यार्थ्यांना हक्काचा आधार निर्माण झाला आहे.