Sun, May 26, 2019 09:25होमपेज › Pune › खंडणी प्रकरणी आशा गवळी आरोपी निष्पन्न

खंडणी प्रकरणी आशा गवळी आरोपी निष्पन्न

Published On: Apr 25 2018 2:00AM | Last Updated: Apr 25 2018 1:56AMमंचर ः प्रतिनिधी

चंदननगर पुणे येथील व्यापार्‍याला खंडणी मागितल्याप्रकरणी गुरुवारी (दि. 19) दाखल झालेल्या गुन्ह्यात कुप्रसिद्ध गुंड अरुण गवळी याची पत्नी आशा ही असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिच्याविरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु याप्रकरणी आशा गवळी हीला 2 मे पर्यंत अटकपूर्व अंतरीम जामीन मिळाल्याने पोलिस तिला जेरबंद करू शकले नाहीत. 

चंदनगर येथील ड्रायफु्रटचे व्यापारी परंतु मुळचे आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील असल्याने त्यांनी खंडणीप्रकरणी गवळी गँगच्या 6 जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी आशा गवळी आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहे.

लोणी येथील व्यापार्‍यानेत तक्रार दिल्याने दुसर्‍या व्यापार्‍याला धीर आल्याने लोणी येथील या व्यापार्‍याने मंचर पोलीसात ठाण्यात गवळी गॅगच्या विरोधात  फिर्याद दिली. 

मंचर पोलीसांनी मोबीन मुजावर, सुरज यादव, ओमकार पंचरास, अमीर मुजावर, गोरक्ष पोखरकर, इजाज व त्याचे 4 ते 5 साथीदार यांच्याविरोधात दुकानाची मोडतोड, मारहाण आणि फोनवरून धमकी देणे, खंडणी मागणे हे गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील मोबीन मुजावर, सुरज यादव, ओमकार पंचरास हे पूर्वीच्या गुन्ह्यात अटक होते. त्यांना या गुन्ह्यात पुन्हा अटक करण्यात आली. मंचर पोलीसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी घोडेगाव न्यायालयाने दिली. 

दरम्यान चंदननगरच्या व्यापार्‍याने पूर्वी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर 6 जणांविरोधात सुरवातीला गुन्हा दाखल झाला होता. आशा गवळी हिने अटकपुर्व अंतरीम जामीन घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.

लोणी येथील खंडणी मागीतलेला हा व्यापारी आजारी असल्याने उपचारासाठी बाहेर गेला होता. त्याने सोमवारी रात्री तक्रार दाखल केली. 5 फेब्रुवारीला व्यापार्‍याच्या भावाकडे पाच लाख रूपयांची खंडणी मागण्यात आली. त्यावेळी गवळी गँगच्या 10 ते 12 जणांनी व्यापार्‍याच्या देशी दारूच्या दुकानात जावून तोडफोड व मारहाण केली होती. यावेळी त्यांनी सीसीटीव्हीची तोडफोड करण्यात आली होती. या तोडफोडीत दुकानाचे 40 हजार रूपयांचे नुकसान झाले होते. व्यापारी उपचार घेवून घरी आल्यानंतर त्याला हा प्रकार सांगण्यात आला. 7 फेब्रुवारीला आशा गवळी हीचा चुलत भाचा मोबीन मुजावर याने त्याला धमकी दिली. आम्ही मम्मी-डॅडीची माणसे आहोत, तुमची परिस्थिती चांगली आहे, पाच लाख रूपये द्या; अन्यथा गंभीर परिणाम होतील अशी धमकी मोबीन मुजावर याने दिली होती.

गवळी गँगविरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी हा व्यापारी निघाला होता. मात्र भीतीपोटी तो पुन्हा माघारी फिरला. 17 फेबु्रवारीला परत व्यापार्‍याला फोन आला. पैसे दगडी चाळीत पाठवा, असे मोबीन मुजावर त्यांना म्हणाला. त्याप्रमाणे सबंधीत व्यापारी, त्याचा मित्र असे दोघेजण दगडी चाळीत जावून तेथील गाईच्या गोठ्यात मोबीन मुजावर याला भेटून 50 हजार रूपयांची खंडणी देण्यात आली. पुन्हा खंडणीच्या उर्वरीत पैशाची मागणी करण्यात आली. वडगाव पीर यात्रेच्या दरम्यान 10 ते 12 मार्चला मोबीन मुजावर याने पुन्हा धमकी देवून पैशाची मागणी केली. एका पतसंस्थेतून एक लाख रूपये काढून व्यापार्‍याने सबंधीताकडे खंडणी दिली.राहिलेले साडेतीन लाख रूपये कधी देणार अशी दमदाटी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी रविवारी या प्रकरणी फिर्याद दिली.

Tags : pune, pune news, asha gawali