Thu, Jun 20, 2019 21:17होमपेज › Pune › आव्हान म्हणून सीबीएससीच्या विद्यार्थ्याने उचलला मराठीचा विडा

आव्हान म्हणून सीबीएससीच्या विद्यार्थ्याने उचलला मराठीचा विडा

Published On: Jun 01 2018 2:12AM | Last Updated: Jun 01 2018 12:08AMपुणे : प्रतिनिधी

इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना मराठी भाषा लिहिता, वाचता फारच कमी प्रमाणात येते. तर मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना सुध्दा इंग्रजी भाषा लिहिता वाचताना समस्या निर्माण होतात. असे असताना देखील लहानपणापासून इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या यश कुलकर्णीने सीबीएससी बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षेत मराठीविषयी आपुलकी असल्याने मराठी विषय निवडला. मराठीचा विडा उचलत त्याने यशाची उत्तुंग भरारी घेतली.

पिंपरी चिंचवड परिसरात राहणार्‍या यश राजेश कुलकर्णीने सीबीएससीच्या 10 वीच्या परीक्षेत 97.20 टक्के गुण मिळविले आहेत. लहानपणापासून इंग्रजी माध्यमात शिकलेल्या यशला मराठी विषयाला 100 पैकी 99 गुण मिळाले आहेत. यश सिटीप्राईड स्कूल निगडी या शाळेतील विद्यार्थी आहे. यशचे वडील मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून काम करत आहेत. मुलाने मिळविलेल्या यशाने आनंद गगनात मावेनासा झाल्याचे त्यांनी व्यक्त केले. 

इंजिनिअर होण्याचे स्वप्न 

जर्मन लॅग्वेज हा विषय घेतला असता तर आणखी स्कोर झाला असता, मात्र, मराठीविषयी असलेल्या अभिमानामुळे माझ्यासाठी अवघड असलेला मराठी विषय घेतला. भरपूर अभ्यास केल्यामुळे 99 गुण मराठी विषयाला मिळाले. याचा मला अभिमान आहे. भविष्यात मी वडिलांप्रमाणे इंजिनिअर होणार असल्याचे यश कुलकर्णीने सांगितले.