Sun, Jul 21, 2019 12:39होमपेज › Pune › साडेनऊ लाखांचा अपहार 

साडेनऊ लाखांचा अपहार 

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 12 2018 12:46AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

कार्यालयातील अकाउंटटने कामगारांच्या पगाराच्या स्लीपमध्ये कामास नसलेल्या तीन महिलांची नावे वाढवून त्यांच्या नावे पैसे भरत परस्पर 9 लाख 61 हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अकाऊंटंटसह तीन महिलांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश घाटगे (45, सदाशिव पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. तर विष्णूवर्धन शशिकांत वाडी (32, आंबेगाव पठार ) व तीन महिलांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. 

फिर्यादी घाटगे यांची शनिवार पेठ परिसरात केळकर रस्त्यावर क्‍लॉथ स्पा प्रोफेशनल लाँड्री आहे. या लाँड्रीमार्फत ते रेल्वे तसेच रुग्णालयातील कपडे धुणे व इस्त्री करण्याचे काम करतात. त्यांच्याकडे कामाला काही कर्मचारी असतात. त्यांचा पगार व हिशोब पाहण्यासाठी वाडी याला नियुक्त केले होते. दरम्यान डिसेंबर 2016 ते सप्टेंबर 2017 दरम्यान त्याने कामाला नसलेल्या तीन महिलांची नावे कामगारांच्या पगाराच्या स्लीपमध्ये टाकून त्यांच्या नावाने पैसे जमा केले. अशा प्रकारे त्याने 9 लाख 61 हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केली हा प्रकार लक्षात आल्यावर घाटगे यांनी पोलिसात धाव घेतली. दरम्यान तो मागील एक ते दीड महिन्यापासून कामास नाही. तपास सहायक पोलिस निरीक्षक शेवते करत आहेत.