Wed, Apr 24, 2019 20:01होमपेज › Pune › पर्यावरण दाखल्यासाठी आता सल्लागारांची नियुक्ती

पर्यावरण दाखल्यासाठी आता सल्लागारांची नियुक्ती

Published On: Mar 20 2018 2:06AM | Last Updated: Mar 20 2018 12:39AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात वेगवेगळ्या 10 ठिकाणी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. या गृहप्रकल्पाच्या बांधकाम परवानगीसाठी पर्यावरण दाखला, एव्हीन्शेन एनओसी, एमपीसीबी, कॉन्सेन्ट, गॉउंड वॉटर व पर्यावरण संतुलन दर 6 महिन्यांचा अहवाल आवश्यक आहे. यासाठी पालिका सल्लागारांचे पॅनेल बनविले आहे. या पॅनेलमध्ये एसजीएम एनव्हायरो व ग्रीन सर्कल या सल्लागारांची पॅनेलवर निवड केली आहे.

पाच ते 20 हजार चौरस मीटरकरिता 5 लाख 25 हजार प्रति प्रकल्प, 20 हजार ते 50 हजार चौरस मीटरकरिता 6 लाख 20 हजार, 50 हजार ते 1 लाख 50 हजार चौरस मीटरकरिता 7 लाख 35 हजार प्रति प्रकल्प दर मंजूर केला आहे. 29 डिसेंबर 2017 च्या प्रस्तावानुसार पॅनल बनवण्यास मान्यता दिली आहे.

पर्यावरण दाखला मिळविण्यासाठी सल्लागार हे त्या क्षेत्रात अनुभवी व नाबेट या संस्थेचे सदस्य आवश्यक असणे बंधनकारक आहे. त्या अटीनुसार या सल्लागारांच्या निवडीला मान्यता देण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि. 21) होणार्‍या स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे.

 

Tags : Pimpri, Pimpri News,  Pimpri Chinchwad Municipal Corporation, environmental clearance, consultants Appointment,