Mon, Mar 25, 2019 14:04होमपेज › Pune › वारकर्‍यांमध्ये केली प्लास्टिकविरोधी जागृती

वारकर्‍यांमध्ये केली प्लास्टिकविरोधी जागृती

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 12:16AMपुणे : प्रतिनिधी

शासनाने घेतलेला प्लास्टिकबंदीचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांमध्ये रुजण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. त्याद‍ृष्टीने जोन्स लँग लसाले कंपनीच्या काही अधिकारी व कर्मचार्‍यांनी पंढरीच्या पायी पालखी वारीमध्ये जनजागृती अभियान राबवीत कापडी पिशव्यांचे वाटप केले. जेएलएलच्या सीएसआर धोरणांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. या अभियानामध्ये कंपनीचे पुणे क्षेत्रिय व्यवस्थापक संजय राजकुले, आकाश साबे, गजानन वानखडे, अमोल जाधव, विनायक शेलार, निलेश पाटील, मकरंद शिवणे, संजय काकडे, बिष्णू यादव, विनायक देशमुख, चंद्रकांत जाधव, संकेत घवाले, नितीन दरेकर, रोहित भालेराव, अजय कांबळे, अभय तिवारी आदिंनी सहभाग घेतला. यावेळी पालखीमधील वारकरी आणि भाविकांना कापडी पिशव्या तसेच बिस्कीटांची पाकिटे, साबण वितरित करण्यात आले. 

याप्रसंगी राजकुले म्हणाले, कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापन विभागामधील व्यवस्थापक आणि अभियंता मंडळी नेहमीच असे सामाजिक उपक्रम राबवित असतात. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कंपनी काटेकोरपणे राबवत आहे. हीच अंमलबजावणी भाविकांमध्ये राबविण्याच्या दृष्टीने प्लास्टिकविरोधात अभियान राबवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांनी प्लास्टिकविरोधी फलक हातात धरून जनजागरणाचा प्रयत्न केला.