Tue, Jul 23, 2019 19:12होमपेज › Pune › द्वितीय वर्ष डिप्लोमाचे वेळापत्रक जाहीर

द्वितीय वर्ष डिप्लोमाचे वेळापत्रक जाहीर

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 1:31AMपुणे : प्रतिनिधी 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बारावी आणि आयटीआय (दहावीनंतर) अभ्यासक्रमानंतर इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 12 जुलैपर्यंत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना 12 जुलैपर्यंत कागदपत्रे अपलोड करायचे असून, त्याच्यासोबत अर्जाची पडताळणी आणि कन्फर्मेशन करता येणार आहे, अशी माहिती सीईटी सेलतर्फे देण्यात आली आहे.

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या  प्रवेश प्रक्रियेच्या आधारे पदवीधर विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत. सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 300 रुपये, तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 400 रुपये शुल्क आहे. विद्यार्थ्यांना क्रेडिट, डेबिट, नेट बँकिंगद्वारे शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती,  नियमावली www.mahacet.org
आणि http://www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेशांची निश्चिती ही जवळच्या एआरसी सेंटरवर करायची आहे.

सविस्तर वेळापत्रक...

ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची पडताळणी व कन्फर्मेशन - 12 जुलै

जात वैधता प्रमाणपत्र, जमाती पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रे स्वीकारणे - 12 जुलै

प्राथमिक गुणवत्ता यादी - 13 जुलै

गुणवत्ता यादीवर आक्षेप - 14 ते 16 जुलै

जात वैधता प्रमाणपत्र, जमाती पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रे स्वीकारण्याची अंतिम तारीख - 16 जुलै

अंतिम गुणवत्ता यादी - 17 जुलै

रिक्त जागा जाहीर करणे - 27 जुलै

महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे - 18 ते 21 जुलै

प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर - 22 जुलै

एआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्चित करणे - 23 ते 26 जुलै

दुसर्‍या फेरीसाठी रिक्‍त जागा जाहीर - 27 जुलै

महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे - 28 ते 31 जुलै

प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर- 1 ऑगस्ट

एआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्चित करणे- 2 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट

तिसर्‍या फेरीसाठी रिक्‍त जागा जाहीर- 5 ऑगस्ट

महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे- 6 ते 9 ऑगस्ट

प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर- 10 ऑगस्ट

एआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्चित करणे- 11 ते 14 ऑगस्ट

अतिरिक्त प्रवेश फेरीसाठी महाविद्यालयांमधील रिक्‍त जागा जाहीर करणे- 18 ऑगस्ट

महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम अर्ज भरणे- 19 ते 20 ऑगस्ट

प्रवेशाची गुणवत्ता जाहीर होणे- 21 ऑगस्ट

महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश करणे- 22 ते 23 ऑगस्ट

प्रवेशाचा कट ऑफ दिनांक- 28 ऑगस्ट

महाविद्यालयांना डेटा अपलोड करणे- 30 ऑगस्ट