पुणे : प्रतिनिधी
सर्व राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या व महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या ‘श्री मार्तंड देव संस्थान, जेजूरी’ या देवस्थानच्या नेमणुका पुणे सह धर्मादाय कार्यालयाने शुक्रवारी जाहिर केल्या. पुरंदरचे तहसीलदार आणि जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष हे पदसिदध विश्वस्त असून आणखी सात विश्वस्तांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
राजकुमार कांतिलाल लोढा रा. सुखसागर नगर बाग, अॅड. प्रसाद सुरेशराव शिंदे रा. वडगावशेरी, अॅड. अशोक पिराजी संकपाळ (माजी बार असोसिएशन अध्यक्ष) रा. चंदननगर, तुषार भिवाजी सहाने रा. भोसरी, संदीप दशरथ जगताप रा. जेजूरी, शिवराज मारूती झगडे (पत्रकार) रा. जेजूरी आणि पंकज एकनाथ निकुडे रा. जेजूरी अशी नवनिर्वाचित विश्वस्तांची नावे आहेत. सर्व विश्वस्तांच्या नेमणुका पुणे सह धर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी केल्या आहेत.
या विश्वस्तांना समान अधिकार देण्यात आले असून त्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असेल. यावर्षीच्या विश्वस्तपदासाठी राज्यभरातून साडेतीनशे पेक्षा अधिक अर्ज आले होते. यामध्ये प्रसिदध गायिका अनुराधा पौडवाल यांचाही समावेश होता.