Tue, Apr 23, 2019 05:35होमपेज › Pune › अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा, आरोपी बावणेला अटक

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा, आरोपी बावणेला अटक

Published On: Dec 27 2017 2:31PM | Last Updated: Dec 27 2017 2:31PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळ्यातील अनेक दिवसांपासून फरार असलेल्या श्रावण बावणे याला राज्य गुन्हे अन्वेषण शाखेने गुजरातमधील राजकोट येथून अटक केली आहे. श्रावण बावणे हा महामंडळाचा संचालक होता. यापुर्वी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आमदार रमेश कदम यांना अटक करण्यात आली होती. 

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम व व्यवस्थापकीय संचालक बावणे यांनी मोबाईलवरुन दिलेल्या आदेशावरुन पाच व्यक्तींनी तब्बल ५ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये बँकेतून रोखीने काढल्याचे प्रकरण २०१५ मध्ये समोर आले होते.

त्यानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या घटना समोर आल्याने ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. जवळपास ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना होता. अनेक पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये रमेश कदम यांना अटक करण्यात आली. सध्या ते कारागृहात आहेत. त्यानंतर श्रावण बावणे फरार होता. त्याला सीआयडीने गुजरातमधून अटक केली.