Thu, Feb 21, 2019 13:08होमपेज › Pune › अंगणवाडी सेविकांच्या मानधनात य1,500 वाढ

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात य1,500 वाढ

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 1:51AMपुणे  : प्रतिनिधी

राज्यातील बालकांना प्राथमिक पूर्व शिक्षण देणार्‍या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मानधनात एक हजार 500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, तर मदतनिसांच्या मानधनात एक हजार; तसेच मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात एक हजार 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे; तसेच 2017-18 पासून सेविका आणि मदतनिसांना दोन हजारांची भाऊबीज दिवाळीला दिली जाणार आहे.

एकात्मिक बालविकास सेवांतर्गत चालविल्या जाणार्‍या अंगणवाड्यांतील सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची वेळोवेळी मागणी करण्यात येत हेाती. त्यानुसार मानधन वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यात 553 प्रकल्पांतर्गत प्रत्येकी 97 हजार 475 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत.