होमपेज › Pune › शिवसैनिकांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे : निलम गोर्‍हे

शिवसैनिकांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे : निलम गोर्‍हे

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 12 2018 11:14PMयेरवडा : वार्ताहर

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शिवसैनिकांनी सर्व हेवेदावे बाजूला ठेवून तयारीला लागावे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या प्रतोद शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. निलम गो-हे यांनी केले.

येरवड्यातील जनतानगरमध्ये शिवसेनेचे उपशहरप्रमुख आनंद गोयल यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार डॉ. नीलम गो-हे, शहरप्रमुख महादेव बाबर व गटनेते संजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 

वडगावशेरी मतदारसंघातील नवनियुक्त पदाधिका-यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख गोपाळ शेलार, नगरसेवक अविनाश साळवे, नगरसेविका श्वेता चव्हाण, शिव व्यापारी सेनेचे अध्यक्ष चिंटू शेख,  शहरसंघटिका संगीता ठोसर, कविता आंब्रे, सहसंपर्कप्रमुख विजय देशमुख, प्रशांत बधे, माजी उपशहरप्रमुख राजेंद्र शिंदे, गटप्रमुख समन्वयक संजय वाल्हेकर, अनिता परदेशी, अमृता पठारे, नीता वर्मा, शुभदा भगत, शर्मिला भोसले, सुनीता चव्हाण, समन्वयक राजू सावंत, सचिन खांदवे, सूर्यकांत निंबाळकर, विभागप्रमुख किशोर पाटील, विनोद प-हाड, अभिजीत नवल उपस्थित होते.