Sun, Nov 18, 2018 03:39होमपेज › Pune › अबब..! लोहगावमध्ये आढळला ८ फूट लांबीचा अजगर

अबब..! लोहगावमध्ये आढळला ८ फूट लांबीचा अजगर

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 29 2018 12:57AMविश्रांतवाडी : वार्ताहर

गोठणवाडा लोहगाव येथे मोठा अजगर आढळून आला. याठिकाणचे नागरिक अतुल खांदवे, मयुर खांदवे यांनी  सर्पमित्र अजय कोंढावळे व शुभम अधिकारी यांना  रात्री सव्वाबारा वाजता बोलावून  अजगर साप पकडला. 

8 फूट लांबीचा, 15 किलो वजनाचा हा इंडियन रॉक पायथन अजगर असल्याचे  सर्पमित्र अजय कोंढावळे यांनी सांगितले. हा अजगर वनविभागाचे कर्मचारी  विष्णू गायकवाड, हवालदार शीतल फुंदे, वनरक्षक दया डोमो यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी लक्ष्मण टिंगरे यांच्या समक्ष व सर्पमित्र सारंग देवकर, धनंजय जाधव, श्रीधर गायकवाड, गजानन टिंगरे, निलेश खांदवे, सचिन मासुळकर यांनी वनविभागाच्या हद्दीमधे सोडला.