Sun, Sep 23, 2018 00:10होमपेज › Pune › अमृता मुके ठरल्या पैठणीच्या मानकरी

अमृता मुके ठरल्या पैठणीच्या मानकरी

Published On: Dec 18 2017 2:41AM | Last Updated: Dec 18 2017 12:51AM

बुकमार्क करा

वडगाव मावळ : वार्ताहर 

 येथील   सह्याद्री  फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमात अमृता मुके या मानाची पैठणी व  दुचाकीच्या विजेत्या ठरल्या.

  ग्रामदैवत   श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणामध्ये सुनील ढोरे युवा मंच व मयूर ढोरे युवा शक्तीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षा शिवले,   राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, नंदाताई ढोरे, अर्चना भोकरे, मुख्य आयोजक सुनील ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

या प्रसंगी, मंगेशकाका ढोरे, गंगाधर ढोरे, पंढरीनाथ ढोरे, अविनाश चव्हाण,   संगीता म्हाळसकर, मंजुश्री वाघ आदी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये सुमारे 2 हजार महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,  स्मिता बुरुटे (टीव्ही), सुनीता जाधव (फ्रिज), मंजिरी शिंदे (वॉशिंग मशिन), उषा धोंगडे (नथ व अंगठी), वैशाली राठोड (शिलाई मशिन), ज्योती ठोंबरे (मिक्सर), सुनीता अवसरकर (पंखा) यांनी बक्षिसे मिळवली. सिध्देश ढोरे यांनी सूत्रसंचालन केले. तर निवेदक बाळकृष्ण नेहरकर यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले.