Wed, Jan 23, 2019 03:09होमपेज › Pune › नागराज मंजुळेंच्या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांची माघार 

नागराज मंजुळेंच्या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांची माघार 

Published On: Apr 30 2018 12:02PM | Last Updated: Apr 30 2018 12:02PMपुणे : प्रतिनिधी

अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित ‘झुंड’ या चित्रपटामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमाच्या तारखा पुढे पुढे जात असल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. याबाबत त्यांनी निर्मात्याकडून घेतलेले पैसे परत करून आपण हा सिनेमा सोडत असल्याचे कळवले आहे.

अमिताभ यांच्या पीआर टीमनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सैराट या सिनेमाच्या प्रचंड यशानंतर नागराज यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्याच हिंदी सिनेमात काम करण्यासाठी अमिताभ यांना राजी केले होते. त्यासाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात भव्य सेट लावण्यात आला होता. मात्र, त्याला काही संघटनांनी विरोध केल्यामुळे तो काढावा लागला. त्यामुळे सिनेमाच्या शेड्युलवर त्याचा परिणाम झाल्याने अखेर बिग बींनी या सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागराज यांच्या टीमसाठी हे निश्चितच धक्कादायक आहे.

Tags : Nagraj Manjule, Bollywood, Film, Jhund, Amitabh Bachchan