Thu, Jun 27, 2019 11:41होमपेज › Pune › भाजपने ‘घर चलो’ अभियानापेक्षा ‘काम करो’ अभियान राबवावे

भाजपने ‘घर चलो’ अभियानापेक्षा ‘काम करो’ अभियान राबवावे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

निवडणुकीत पिंपरी-चिंचवड मधील जनतेला विविध आश्‍वासने देऊन पालिकेत सत्ता मिळवली. भाजपला त्यांनी दिलेल्या वचनांचा विसर पडला आहे. म्हणून भाजपने घर चलो अभियानापेक्षा काम करो अभियान राबवावे. ते जनतेच्या हितासाठी योग्य राहिल, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी भाजपच्या अभियानावर प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली.

बच्छाव यांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे की, नुकतीच भाजपने पिंपरी-चिंचवड शहरात घर चलो अभियानाची सुरुवात केली आहे. निवडणूकींच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड शहरातील आश्‍वासनांचे गाजर दाखवित भाजप सत्तेत आली; परंतू आजतागायत भाजपने दिलेल्या आश्‍वासनांची पुर्तता करण्यात सत्ताधारी अकार्यक्षम ठरले आहेत. शहरातील बेकायदा बांधकामे, शास्तीकर, तास पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य अशा अनेक विषयांत शहरवासीयांचा अपेक्षाभंग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच काळात मंजूर तथा सुरू झालेली कामे शहरात दिसून येत आहेत. केवळ उद्घाटनांचा सपाटा लावून प्रत्यक्षात मात्र विकासकामे प्रलंबितच आहेत, असा आरोप बच्छाव यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छतेचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे.राष्ट्रवादीची सत्ता असताना गेल्या वर्षी स्वच्छ शहर म्हणून राज्यात प्रथम आणि देशात 9 वा क्रमांक पटकाविलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची केंद्र सरकारने जाहीर केलेल्या दुसर्‍या यादीत 9 व्या क्रमांकावरून थेट 72 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. 

राष्ट्रवादीच्या काळात शहरात राबविलेल्या विविध स्वच्छतेच्या मोहिमांमध्ये भाजपने सातत्य न टिकविल्याचे यातून अधोरेखित होत आहे. शहरातील दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी, तरूणांच्या रोजगाराचा प्रश्‍न, पालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे दिवसेंदिवस वाढल्याचे दिसून येत आहे, अशी अनेक कामे करण्यात भाजप निष्क्रीय ठरले. यामुळे जनतेते नैराश्य पसरले आहे. भाजप सरकारला आपले अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव राहिलेली नाही. म्हणून भाजपने घर चलो अभियानापेक्षा काम करो अभियान राबवावे, अशी टिका बच्छाव यांनी केली आहे.


  •