होमपेज › Pune › मुळा नदीपात्रात अमेरिकन मासा

मुळा नदीपात्रात अमेरिकन मासा

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 24 2018 11:28PMदापोडी : वार्ताहर  

दापोडीमधील हॅरिस ब्रिजखाली मुळा नदीपात्रात रविवारी अमेरिकन मासा सापडला. हा अनोखा मासा नदीपात्रात सापडल्याने दापोडी परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.रहमान अब्दुल सत्तार यांना मासे पकडण्याचा छंद आहे. दरवर्षी पावसाळ्याचे चार महिने ते मासे पकडण्यासाठी जातात. त्यांचे वडील देखील त्यांच्या नावेतून मासे पकडण्यासाठी जात असत.  सत्तार रहमान रविवारी सकाळी मासे पकडण्यासाठी हॅरिस पुलाखालील मुळा मुठा नदीकिनारी गेला असता त्यांच्या जाळ्यात अनोखा मासा आला.दररोज सापडणा-या माशांसारखा हा मासा नसल्याची खात्री झाल्यानंतर त्याने इंटरनेटवर याबाबत शोध घेतला. त्यावेळी त्याला हा मासा ऑलिगॅटर गॅर फिश प्रकारचा असल्याची माहिती त्यांना मिळाली. हा मासा प्रामुख्याने उत्तर अमेरिकेत आढळतो. याचे वजन साधारणपणे 140 किलोपर्यंत वाढते. लांबीला हा मासा दहा फूट होतो. असा हा अनोखा मासा बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकाच गर्दी केली आहे.