Sun, Aug 25, 2019 19:54होमपेज › Pune › वारीत 4 हजार कापडी पिशव्यांचे वाटप

वारीत 4 हजार कापडी पिशव्यांचे वाटप

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 06 2018 11:00PMपिंपरी : प्रतिनिधी 

प्राधिकरण नागरी सुरक्षा सोसायटी व जैन सोशल ग्रुप डायमंड पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्‍त विद्यमाने तसेच पुणे ग्रामीण पोलीस यांच्या सहकार्याने ’प्लास्टिक मुक्‍तवारी अभियान - 2018’ ची सुरुवात देहू येथून करण्यात आली. सदरचे अभियान 5 जुलै ते 27 जुलै 2018 दरम्यान आयोजित केले आहे. या अभियानाची सुरुवात 4 हजार कापडी पिशव्या वारकर्‍यांना वाटून करण्यात आली. 

अभियानाची सुरुवात देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार, पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर, मनोज पवार, जैन सोशल ग्रुप डायमंडचे अध्यक्ष सुनील शहा, सेक्रेटरी अतुल धोका, प्राधिकरण नागरी सुरक्षा सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, अर्चना घाळी ह्यांच्या हस्ते करण्यात आली.प्लास्टिक पिशव्या बंदीमुळे वैष्णवांना नित्य उपयोगी साहित्य तसेच दैनंदिन शिदोरीवारी मध्ये बाळगण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. यावर पर्यावरणपूरक तोडगा काढणे करिता कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचे दोनही संस्थांनी ठरवले व त्यानुसार रोजी देहू मध्ये प्लास्टिक मुक्‍तवारी अभियानाची सुरुवात करण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितले.