Mon, Mar 18, 2019 19:30होमपेज › Pune › महापालिकेच्या सर्व शाळा होणार ‘सेमी इंग्लिश’

महापालिकेच्या सर्व शाळा होणार ‘सेमी इंग्लिश’

Published On: Aug 03 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 12:10AMपिंपरी : प्रतिनिधी

महापालिकेच्या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेच्या सर्व शाळेत सेमी इंग्लिश सुरू करण्याचा निर्णय शिक्षण समितीमध्ये आज (गुरुवारी) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्ष स्थानी शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे होत्या.सभेस उपसभापती शर्मिला बाबर, सुवर्णा बुर्डे, शारदा सोनवणे, विनया तापकीर, उषा काळे, यांनी चर्चेत सहभाग घेतला.

महापालिकेच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा घसरत चालला होता. शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी दर्जेदार शिक्षणाची गरज आहे. महापालिकेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शिक्षण समितीने आज झालेल्या सभेत सेमी इंग्लिश सुरू करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाची अंमलबजावणी या वर्षापासुनच करावी यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती सोनाली गव्हाणे यांनी दिली.

शहरातील महिलांसाठी असुरक्षितचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय जनता पक्षाने  महापालिकेच्या निवडणूकीत भयमुक्त शहर असे अभिवचन दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या शाळेतील मुलींना कराटेचे प्रशिक्षण देवून मुलींना स्वतःची सुरक्षा करू शकते असे सक्षम बनविण्याचा प्रयत्न महापालिकेचा राहणार आहे. या प्रशिक्षणासाठी महापालिकेला खर्च करण्याची आवश्यकता नाही. सी एस आर च्या माध्यमातून प्रशिक्षणावर खर्च करण्यात येणार असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.