Mon, Jul 15, 2019 23:42होमपेज › Pune › दोन्ही सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी : अजित पवार

दोन्ही सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी : अजित पवार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


पिंपरी : प्रतिनिधी
केंद्र व राज्यातील सरकार सर्वपातळ्यांवर अपयशी ठरले असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केला. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज रविवारी सरकारविरोधात आकुर्डी गावठाण पासून प्राधिकरणातील तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून  'हल्लाबोल' आंदोलन करण्यात आले. त्या वेळी प्राधिकरण कार्यालया समोर आयोजित सभेत ते बोलत होते. 

अजित पवार यांनी भाषणतसरकारवरकडाडून टीका केली. ते म्हणाले, 'केंद्र व राज्य सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. एक बेजबाबदार सरकार म्हणून याचा उल्लेख करता येईल. सरकार अपयशी  ठरल्याने आंदोलन करण्याची वेळ आली आहे. मुंबई विद्यापीठामध्ये पेपर तपासले न गेल्याने विद्यार्थ्यांचे एकवर्ष वाया घालवले. राष्ट्रवादीच्या राज्यात मी ऊर्जामंत्री असताना भारनियमन बंद होते. यांनी कोळसा घ्यायला पैसे नाहीत म्हणून वीज कपात केली. ज्यांच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे ते  पोलिसच यांच्या राज्यात जनतेला मारत आहेत.'