Wed, Nov 14, 2018 21:07होमपेज › Pune › अजित पवारांनी सल्लागार बदलावेत

अजित पवारांनी सल्लागार बदलावेत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी :   प्रतिनिधी 

आंद्रा धरणातून 100 एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी पाणीसाठा उलचण्याचा आरक्षण कायम असून, तो रद्द केलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना स्थानिक नेतेमंडळी चुकीची माहिती देत असून, त्यांनी आपले ‘सल्लागार’ बदलावेत, असा उपरोधिक सल्ला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी अजित पवार यांना दिला. 

ते सोमवारी (दि.27) पत्रकारांशी बोलत होते. सत्ताधारी भाजपच्या दुर्लक्षामुळे आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी साठा उचलण्यास राखीव साठा राज्य शासनाने रद्द केला आहे, असे अजित पवार यांनी रविवारी (दि.26) झालेल्या हल्लाबोल आंदोलनात टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना एकनाथ पवार म्हणाले, की पाणी उचलण्याचा साठा अद्याप कायम आहे. अद्याप महापालिकेने पाणी उचण्यास सुरुवातच केलेली नाही. त्यामुळे तो रद्द करण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. साठा आरक्षण राज्य शासनाने रद्द केलेला नाही. जलसंपदा विभागासोबत दर वर्षी करार करावा लागतो. तो करार करण्याबाबत शासनाने सुचित केले होते. त्यानुसार नव्याने करार केला आहे. 

अजित पवार यांना त्यांच्या पक्षाचे स्थानिक नेतेमंडळी आणि पदाधिकारी चुकीची माहिती देत आहेत. त्यामुळे ते तसे बोलतात. याच कारणाने महापालिकेतील सत्ता हातातून गेली आहे. पवार यांनी आपले ‘सल्लागार’ बदलावेत, असा सल्ला एकनाथ पवार यांनी दिला आहे.