Sun, Nov 18, 2018 19:50होमपेज › Pune › अजित पवार चक्क दुचाकीवरून!

अजित पवारांनी दुचाकीवर स्वार होत लग्न गाठले!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

सूस येथे वाहतूककोंडीत अडकलेल्या अजित पवार यांनी  दुचाकीवर स्वार होत लग्न गाठले आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना पवारांच्या वक्तशीरपणाचा अनुभव आला.

माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांची पुतणी चि. सौ. कां. किरण आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांचे चिरंजीव हर्षवर्धन यांचा विवाह सोहळा सूस रोडवरील सनिज् वर्ल्ड या ठिकाणी  होता; मात्र सूस रोड ते सनिज् वर्ल्डदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.

अजित पवार वाहतूककोंडीत अडकल्याचे पाहून कार्यकर्त  धावत पुढे गेले. त्यांनी पुढे आणखी गर्दी असल्याचे  पवार यांना सांगताच विवाह सोहळ्याला वेळेत उपस्थित राहण्यासाठी पवार यांनी चारचाकी सोडून विशाल वाकडकर यांच्या कार्यकर्त्याच्या दुचाकीवर पाठीमागे बसून जाणे पसंत केले, तर राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी सुद्धा  विनोद नढे यांच्या गाडीवर जाणे पसंत केले. 

या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, सुनील गव्हाणे, विशाल वाकडकर या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांसाठी रस्ता मोकळा करण्यास मदत केली. अजित पवार यांच्या या वक्तशीरपणाची चर्चा विवाह सोहळ्यात रंगली होती.