Mon, Jun 17, 2019 18:16होमपेज › Pune › विमानतळास विरोधासाठी शेतकर्‍यांचा एल्गार 

विमानतळास विरोधासाठी शेतकर्‍यांचा एल्गार 

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 1:38AMपारगाव मेमाणे ; वार्ताहर

पारगाव मेमाणे येथे सोमवारी (दि. 5) पारेश्वर मंदिर आवारामध्ये पुरंदर येथील प्रास्तावित विमानतळास जमीन देण्यास शेतकर्‍यांचा विरोध सरकारदरबारी पोहोचविण्यासाठी आंदोलन करण्यात आले. तसेच यापुढे तीव्र लढा देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यासंदर्भात नियोजन यावेळी करण्यात आले. विमानतळ करायचंच असेल तर आम्हाला इच्छामरण द्यावे, यासाठीचा ठराव करून तो 
राष्ट्रपतींकडे पाठविण्याचे या वेळी ठरविण्यात आले.

 विमानतळास सर्व शेतकर्‍यांचा विरोध असल्याचा ठराव केला आहे. तसेच राष्ट्रपतींकडे इच्छामरणाच्या मागणीचा देखील या वेळी ठराव करून आमचा विरोध सरकारपर्यंत पोहोचविण्याठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा नेणार आहोत, असे सर्जेराव मेमाणे यांनी सांगितले.
शेतकर्‍यांचे अस्तित्व नष्ट करून विकास होत नाही.

आम्ही शेतकर्‍यांवर होणारा अन्याय सहन करणार नाही. विमानतळ विरोधासाठी आमरण उपोषण करू, असे बळीराजा शेतकरी संघाचे अध्यक्ष गणेशकाका जगताप यांनी सांगितले. भूमिहीन होतोय, शेतकर्‍यांच्या या लढ्यात आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत, असे महाराष्ट्र शेतकरी सेनेचे अध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांनी सांगितले.