होमपेज › Pune › अखेर गॅस दाहिनी सुरु झाली

अखेर गॅस दाहिनी सुरु झाली

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 10:18PM



पुणे : प्रतिनिधी

औंध स्मशानभुमीमध्ये असलेल्या असुविधेबाबत दै. पुढारीने दिलेल्या बातमीची दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेली गॅस दाहिनी आज अखेर सुरु झाली असल्याची माहिती औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य निरीक्षका कविता निम्हण यांनी दिली. 

शहराच्या उपनगर भागात असलेल्या औंध स्मशानभुमीमध्ये येणार्‍या नातेवाईकांना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याने तेथील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. याची माहिती दै. पुढारीच्या माध्यमातून देण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्याची त्वरीत दखल घेतली. चार दिवसापुर्वीची महापालिकेचे सुपरवायझर यांनी औंध स्मशानभुमीची पाहणी करुन गळत असलेल्या ठिकाणी वेल्डिंग करुन पाणी गळती थांबविण्याबाबत उपाययोजना राबविण्याबाबतचे निर्देश दिले. तसेच गॅस दाहिनीची ही पाहणी करीत गॅस दाहिनी दुरुस्तीचे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे संबंधित कंपनीच्या वतीने गॅस दाहिनीची दुरुस्ती करण्यात आली असून ती सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे. 

याबाबत औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य निरीक्षिका कविता निम्हण म्हणाल्या, छतामधून गळत असलेल्या पाण्याबाबत महापालिकेचे सुपरवायझर यांनी पाहणी करुन गेले होते. त्यानंतर गॅस दाहिनी दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीचे अधिकारी सकाळपासून काम करीत होते. सर्वसामान्यांच्या सेवेसाठी गॅस दाहिनी सुरु करण्यात आली आहे.