Mon, Mar 25, 2019 04:58
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › शहरात १९ हजार दारूचे व्यसनी 

शहरात १९ हजार दारूचे व्यसनी 

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 19 2017 12:10AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

आरोग्य विभागाने एक डिसेंबरपासून सुरू केलेल्या मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेत पहिल्या आठवड्यातच पुणे विभागात तीन लाख 76 हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी दारूचे व्यसन असलेले 19 हजार रुग्ण सापडले आहेत.

मौखिक आरोग्य तपासणी करण्यासाठी पुणे परिमंडळाच्या अरोग्य उपसंचालक कार्यालयाने एक ते 31 डिसेंबरदरम्यान ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत पुणे, सोलापूर आणि सातारा येथील गावांतील प्रत्येक घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. या तीन जिल्ह्यांत एक ते आठ डिसेंबरपर्यंत एकूण तीन लाख 76 हजार रुग्णाांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दारूचे व्यसन, तोंडाचा संशयित कर्करोग आदींमध्ये त्यांची विभागणी करण्यात आली.

यामध्ये तीन लाख 76 हजार रुग्णांपैकी 19 हजार 736 जणांना दारूचे व्यसन असल्याचे आढळून आलेले आहे. यावरून दारूचे व्यसन किती मोठ्या प्रमाणात आहे हे दिसून येत आहे. तर एक हजार 708 तोंडाचा कर्करोग असलेले संशयित रुग्ण सापडले आहेत. तोंडाचा कर्करोग असलेल्या रुग्णांची संख्या ही तंबाखू, सुपारी, गुटखा, दारूच्या व्यसनामुळे वाढत आहे. म्हणजेच एक हजार 708 रुग्णांमध्ये कर्करोगाची प्राथमिक लक्षणे दिसून आले. तर  तंबाखू, गुटख्याचे व्यसन असलेल्या 79 हजार 919 लोक असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिली.

तंबाखूचे सेवन हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. याविषयी समाजामध्ये जनजागृती व्हावी मौखिक कर्करोग पूर्व अवस्थेत ओळखला तर तो कर्करोगापासून आपण वाचवू शकतो. यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अथवा असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत याचे आयोजन करण्यात आले आहे. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, उद्भवणारे आजार याबद्दल जनजागृतीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद, पुणेआरोग्य विभाग , जिल्हा रुग्णालये, महापालिका व सामाजिक संस्था यांच्या वतीने ही तपासणी करण्यात येत आहे.