Wed, Jun 26, 2019 11:59होमपेज › Pune › मालमत्तेची माहिती लपविणार्‍या अधिकार्‍यांवर होणार कारवाई 

मालमत्तेची माहिती लपविणार्‍या अधिकार्‍यांवर होणार कारवाई 

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 1:21AMपुणे :  प्रतिनिधी

मालमत्तेचे विवरणपत्र सादर न करता, माहिती लपविणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले.महापालिकेच्या वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या अधिकार्‍यांना दरवर्षी  मालमत्तेचे विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, महापालिकेच्या 116 पैकी केवळ 68 अधिकार्‍यांनीच यावर्षी त्यांच्या मालमत्तेची माहिती सादर केलेली आहे. उर्वरित 48 अधिकार्‍यांनी प्रशासनाने दोन वेळेस मुदत देऊनही मालमत्तेचे विवरणपत्र भरले नाही. त्यासंबधीचे वृत्त दै. ‘पुढारी’ने मंगळवारी प्रसिद्ध केले होते. त्यावर स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी मालमत्तेची माहिती लपविणार्‍या अधिकार्‍यांबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता. या प्रश्‍नावर उत्तर देताना आयुक्त सौरभ राव यांनी वारंवार सूचना दिल्यानंतरही ज्या अधिकार्‍यांनी अद्यापपर्यंत मालमत्तेची माहिती दिली नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.